जिल्हा

सार्वजनिक शौचालयात एकाची हत्या

सार्वजनिक शौचालयात एकाची हत्या
सार्वजनिक शौचालयात एकाची हत्या फोटो: ठाणे वैभव

ठाणे: सार्वजनिक शौचालयात जाण्याच्या कारणावरून दोन जणांनी एका कामगाराला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर कडाप्पा फरशीच्या तुकड्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी अवस्थेत त्याला शौचालयाच्या पाठीमागील नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना कापूरबावडी नाका येथे घडली.

या घटनेत राजू गुजराती (४०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तक्रारदारांचा भाऊ रमन गांधी मिश्रा (२९) आणि मित्र प्रल्हाद तिलकधारी गौड (२८) या दोघांविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) रात्री ११ वाजण्यापूर्वी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. राजू गुजराती हा कापूरबावडी पुलाखाली राहत होता. बिगारी तसेच मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करत होता. तो नियमितपणे कापूरबावडी नाक्यावरील सार्वजनिक शौचालयात शौचास आणि आंघोळीसाठी येत होता. सार्वजनिक शौचालयाचे काम पाहणाऱ्या गिरीशकुमार झा यांनी रात्री राजूला दोन जण मारहाण करत असल्याची माहिती शौचालयाचे कंत्राटदार राजू गांधी मिश्रा यांना फोनवरून दिली. मिश्रा घटनास्थळी पोहोचेपर्यंत संशयित दोघे तेथून निघून गेले होते. त्यानंतर गिरीशने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर दोघांनी शौचालयामागील नाल्यात पाहणी केली असता राजूचे केवळ पाय दिसत होते. त्याचे शरीर सिमेंटच्या रिकाम्या गोण्या, रेक्झिनच्या बॅग व कचऱ्याने झाकण्यात आले होते. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने राजूला नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा असून रक्तस्राव झाल्याचे तसेच डाव्या हाताच्या मागील बाजूस खरचटल्याचे आढळले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात टाकून कचऱ्याने झाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करीत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475